Jailer Film: सुपरस्टार रजनीकांतची क्रेझ; 'जेलर' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी चेन्नई शहरभर लावले पोस्टर्स (See)

रजनीकांतच्या चाहत्यांनी 'जेलर' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी संपूर्ण चेन्नई शहरात त्याचे पोस्टर्स चेन्नईभर लावले आहेत.

Rajinikanth

देशासह परदेशातही सुपरस्टार रजनीकांतची क्रेझ आहे. जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. हे चाहते रजनीकांतच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी, बेंगळुरू, चेन्नईच्या अनेक कंपन्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना मोफत तिकिटे देण्यात आली आहे. आता रजनीकांतच्या चाहत्यांनी 'जेलर' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी संपूर्ण चेन्नई शहरात त्याचे पोस्टर्स चेन्नईभर लावले आहेत. या चित्रपटात रजनीकांत तसेच जॅकी श्रॉफ, शिवा राजकुमार, सुनील, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, मायर्ना मेनन, योगी बाबू आणि विनायकन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (हेही वाचा: Pushpa 2 New Poster: 'पुष्पा-2' चं नवं पोस्टर रिलीज; फहाद फासिलचा रावडी लूक)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement