Sukesh Chandrashekhar Extortion Case: जॅकलिन फर्नांडिसची 14 तारखेला पुन्हा होणार चौकशी, दिल्ली पोलिसांकडून नवीन समन्स जारी

पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसला तपासात सहभागी होण्यासाठी समन्स बजावण्याची ही तिसरी वेळ आहे.

Jacqueline Fernandez (Photo Credit: Facebook)

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सोमवारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) सुकेश चंद्रशेखरशी कथित संबंध असलेल्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात पुढील चौकशीसाठी 14 सप्टेंबरला हजर राहण्यासाठी नवीन समन्स बजावले आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी होणारी चौकशी पुढे ढकलली होती कारण अभिनेत्रीने तिच्या पूर्व नियोजित वेळापत्रकाचा हवाला देऊन 15 दिवसांनी तारीख मागितली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला जास्त वेळ दिला नाही आणि बुधवारी तिला तपासात सहभागी होण्यास सांगितले. पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसला तपासात सहभागी होण्यासाठी समन्स बजावण्याची ही तिसरी वेळ आहे. याची पुष्टी करताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्रीला 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मंदिर मार्ग येथील EOW कार्यालयात हजर राहण्यासाठी नव्याने समन्स बजावण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement