Gaurav More: गौरव मोरेची 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये धमाकेदार एन्ट्री, हिंदीतील छोटा पडदा गाजवणार
'मॅडनेस मचाएंगे' मध्ये काम करत असल्याने आता गौरव महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील विनोदवीर गौरव मोरे (Gaurav More) आता हिंदीतील छोटा पडदा गाजवण्यास सज्ज झाला आहे. गौरव हा सोनी वाहिनीवरील 'मॅडनेस मचाएंगे' शोमध्ये झळकणार आहे. त्याचा प्रोमो नुकताच लाँच झाला आहे. या प्रोमोत एका स्किटमध्ये गौरव मोरेसह हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके आहेत. त्यामध्ये या तिघांच्या कॉमेडीची धमाल दिसून आली आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)