FTII President: अभिनेते R Madhavan यांच्यावर नवी जबाबदारी; एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

माहिती प्रसारण मंत्रालयाने ही बातमी शेअर केली असून अनुराग ठाकूर यांनीही त्याबद्दल माधवन यांचे अभिनंदन केले आहे.

R Madhavan

साऊथ तसेच बॉलीवूड चित्रपट स्टार आर माधवन हे त्यांच्या अनेक भूमिका, पुरस्कार, विविध व्यासपिठांवरील त्यांच्या भाषणांसाठी ओळखले जातात. चित्रपटांमध्ये यशस्वी करिअर करण्यासोबतच आर माधवन सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. नुकतेच त्यांच्या रॉकेट्री द नंबी इफेक्ट या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार प्राप्त झाला. आता आर माधवन यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आर माधवन यांची पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाने ही बातमी शेअर केली असून अनुराग ठाकूर यांनीही त्याबद्दल माधवन यांचे अभिनंदन केले आहे. एफटीआयआयच्या या पदावर यापूर्वी दिग्गज चित्रपट निर्माते शेखर कपूर होते पण त्यांचा कार्यकाळ 3 मार्च 2023 रोजी संपला होता. आता आर माधवन या पदावर आहेत. (हेही वाचा: Kaala Trailer: भूषण कुमार 'काला 'सीरीजमधून डिजिटलमध्ये करणार पदार्पण,सीरिज १५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)