Folk Singer Sharda Sinha Passes Away: प्रख्यात भोजपुरी लोकगायिका शारदा सिन्हा यांचे निधन; दिल्ली एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास
त्यानंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
Folk Singer Sharda Sinha Passes Away: पद्म पुरस्काराने सन्मानित बिहारच्या प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे निधन झाले आहे. मंगळवारी रात्री उशिरा दिल्ली एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी सायंकाळी शारदा सिन्हा यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर हलवावे लागले. मंगळवारी त्यांनी प्राण सोडले. 72 वर्षीय शारदा सिन्हा यांची प्रकृती गेल्या महिन्यातच खालावली होती. त्यानंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शारदा सिन्हा यांची प्रकृती अचानक पुन्हा खालावली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर हलवावे लागले. आता आज रक्ताच्या कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला. शारदा सिन्हा या लोकप्रिय गायिका होत्या आणि त्यांनी गायलेली छठ गाणी बिहारमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. संगीतातील अभूतपूर्व योगदानासाठी त्यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार मिळाले आहेत. शारदा यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1952 रोजी बिहारमध्ये झाला. त्यांनी प्रामुख्याने मैथिली आणि भोजपुरी भाषांमध्ये गाणी गायली, जी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. छठपूजा, लग्न, सांस्कृतिक सणांना त्यांच्या गाण्यात विशेष स्थान होते. (हेही वाचा: Quincy Jones Passes Away: संगीत निर्माते क्विन्सी जोन्स यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन)
Folk Singer Sharda Sinha Passes Away:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)