Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारा प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई, दुचाकी जप्त केल्यानंतर दोन अज्ञात लोकांविरुद्ध FIR दाखल.
मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गोळीबार करणारे हे महाराष्ट्रातील नसून दुसऱ्या राज्यातील असल्याचे सांगितले.
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलीस कारवाईत आले आहेत. गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीने दोन अज्ञात लोकांविरुद्ध भादंवि कलम ३०७ आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुंबई पोलीस अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. मात्र, प्राथमिक तपासात मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गोळीबार करणारे हे महाराष्ट्रातील नसून दुसऱ्या राज्यातील असल्याचे सांगितले.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)