Rajkumar Santoshi Jailed: बॉलिवूड चित्रपट निर्माता राजकुमार संतोषी जाणार तुरुंगात, चेक बाऊन्स प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा

बाऊन्स झालेल्या चेकसाठी 1.50 लाख रुपये देण्याचे न्यायालयाचे आदेश असूनही, संतोषी यांनी जामीनपात्र वॉरंट जारी होईपर्यंत समन्स स्वीकारण्यास नकार दिला.

चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जामनगर कोर्टाने त्यांना चेक बाऊन्स प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, तसेच त्याला दुप्पट रक्कम म्हणजेच 2 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. संतोषी यांनी 2015 मध्ये अशोक लाल नावाच्या व्यक्तीकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांचे दहा धनादेश जारी करून 1 कोटी रुपये उसने घेतले, जे  2016 मध्ये बाऊन्स झाले. संतोषी यांनी उत्तर न दिल्याने लाल यांनी गुन्हा दाखल केला. बाऊन्स झालेल्या चेकसाठी 1.50 लाख रुपये देण्याचे न्यायालयाचे आदेश असूनही, संतोषी यांनी जामीनपात्र वॉरंट जारी होईपर्यंत समन्स स्वीकारण्यास नकार दिला. राजकुमार संतोषी यांना चेक अनादर प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि 30 दिवसांच्या आत तक्रारदाराला 20 लाख रुपये देण्याचे आदेश दिले.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaj Tak (@aajtak)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement