Fateh Teaser Update: 'फतेह' चित्रपटाचा टीझर उद्या होणार रिलीज, अभिनेत्याने शेअर केला पहिला पोस्टर

अभिनेता सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपट फतेह चा टीझर उद्या रिलीज होणार आहे.

Fateh movie insta

Fateh Teaser Update:  अभिनेता सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपट 'फतेह'चा टीझर उद्या  रिलीज होणार आहे. सोनू सूदने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर 'फतेह' चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर पाहून हा चित्रपट अॅक्शन चित्रपट असल्याचे समजते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनू सूद यांनीच केले असून झी स्टुडिओज आणि सोनाली सूद यांची निर्मिती आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहून चाहत्यांनी कौतुकाचे वर्षाव केला आहे.  चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. (हेही वाचा- 'बस्तर: द नक्षल स्टोरी' दाखवते नक्षलवादाचे कटू सत्य, जाणून घ्या, कथा आणि इतर माहिती)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)