Happy Birthday Kamal Haasan: चाहत्यांनकडून कमल हसन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

राजकीय वर्तुळातही त्यांच्या नावाचा दबदबा असल्याचे पाहायला मिळतो. आज वाढदिवसानिमित्त सगळ्या क्षेत्रातुन त्याच्यावर शुभेच्छाच वर्षाव होत आहे.

Kamal Haasan | (Photo Credits: Facebook)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी तसेच बॉलिवडूमध्येदेखील आपल्या अभिनयाच्या जोरावर दबदबा निर्माण करणारे अभिनेता कमल हसन (Kamal Hasan) यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1954 रोजी झाला. कमल फक्त एक अभिनेता नसून एक अष्टपैलूव्यक्तिमत्व आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, पार्श्वगायक अशी अनेक क्षेत्रात त्यांनी खुबीने काम केले आहे. राजकीय वर्तुळातही त्यांच्या नावाचा दबदबा असल्याचे पाहायला मिळतो. आज वाढदिवसानिमित्त सगळ्या क्षेत्रातुन त्याच्यावर शुभेच्छाच वर्षाव होत आहे.

चाहत्यांन कडून कमल हसन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 

कमल हासन यांनी एक बाल कलाकार म्हणून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. ‘कलाथुर कन्नामा’ हा त्यांचा पहिलावहिला चित्रपट होता. त्यानंतर ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्यानंतर ‘सागर’, ‘गिरफ्तार’, ‘जरा सी जिंदगी’, ‘राज तिलक’, ‘एक नई पहेली’, ‘चाची 420’, ‘हे राम’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यातील ‘चाची 420’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करत कमल हासन यांनी साकारलेल्या स्त्री भूमिकेचे कौतुक झाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)