Drugs-on-Cruise Case: आर्यन खानचा आजचा मुक्कामही तुरुंगात; मुंबई उच्च न्यायालयाने जमीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली

20 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने एनडीपीएस कायद्यांतर्गत जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने तातडीने उच्च न्यायालयात धाव घेतली

आर्यन खान (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज (२५ ऑक्टोबर, मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता जामीन अर्जावर उद्या (बुधवार, 27 ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. उद्या दुपारी 2.30 वाजता ही सुनावणी होणार आहे. म्हणजेच आजची रात्रही आर्यन खानला तुरुंगातच काढावी लागणार आहे.

20 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने एनडीपीएस कायद्यांतर्गत जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने तातडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. आर्यन खानचा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्ट आणि सेशन्स कोर्टाने फेटाळल्यानंतर भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी आज त्याची बाजू मांडण्यासाठी हजर झाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement