Drugs-on-Cruise Case: आर्यन खानला आजही मिळाला नाही जामीन; सुनावणी उद्यासाठी पुढे ढकलली
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खान आणि इतरांना 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकून अटक केली होती.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारीही सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या वतीने एएसजी उद्या उत्तर देणार आहे. सुनावणी उद्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. तिन्ही आरोपींची उलटतपासणी आज पूर्ण झाली. या हायप्रोफाईल प्रकरणात मंगळवारीही मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊ शकली नव्हती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खान आणि इतरांना 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकून अटक केली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)