Diljit Dosanjh स्टारर 'Jogi'चा दमदार Trailer रिलीज, 1984 च्या दंगलीवर आधारित चित्रपट
या चित्रपटात दिलजीतसोबतच कुमुद मिश्रा, मोहम्मद झीशान अय्युब, अमायरा दस्तूर आणि हितेन तेजवानी या कलाकांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
दिलजीत दोसांझ स्टारर 'जोगी' या चित्रपटाचा ट्रेलर आज म्हणजेच मंगळवारी रिलीज झाला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट 16 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, जो 84 च्या दिल्ली दंगलीच्या आधारावर आहे. या चित्रपटाची कथा तीन दिवस चाललेल्या दंगलीत स्वत:च्या आणि कुटुंबाच्या जीवासाठी लढणाऱ्या तीन मित्रांवर आधारित आहे. दिलजीत दोसांझ स्टारर या चित्रपटाचा ट्रेलर 84 च्या दंगलीची आठवण करून देणारा, बघायला खूप भयावह वाटतो. दंगली दरम्यान झालेली हिंसा आणि लोकांना होणारा त्रास याचं दृष्य ट्रेलरमध्ये दिसत आहे. या चित्रपटात दिलजीतसोबतच कुमुद मिश्रा, मोहम्मद झीशान अय्युब, अमायरा दस्तूर आणि हितेन तेजवानी या कलाकांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)