Dharmendra Health Update: अभिनेता धर्मेंद्र रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी खोटी; स्वतः व्हिडीओ शेअर करत दिली माहिती (Watch Video)

आता या बातम्यांवर 86 वर्षीय धर्मेंद्र यांनी स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Dharmendra Health Update (संग्रहित संपादित प्रतिमा)

सोमवारी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचेही सांगितले गेले होते. क्षणार्धातच ही बातमी व्हायरल झाली. आता या बातम्यांवर 86 वर्षीय धर्मेंद्र यांनी स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या तब्येतीबाबतच्या वृत्तांचे खंडन केले आहे. त्यांनी सांगितले की ते आजारी नाहीत व पूर्णपणे ठीक आहेत.

व्हिडिओमध्ये धर्मेंद्र म्हणतात, 'नमस्कार मित्रांनो, सकारात्मक राहा, सकारात्मक विचार करा, जीवन सकारात्मक होईल. मी आजारी नाही. असो, काही ना काही अफवा उडतच राहतात. वाईट पाहू नका, वाईट बोलू नका. काळजी घ्या, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांशी चांगले वागा. आयुष्य सुंदर होईल.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif