अभिनेते Dharmendra वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेत गेल्याची चर्चा असताना शेअर केला हॉलिडे चा आनंद लुटत असल्याचा व्हिडिओ (Watch Video)
धर्मेंद्र यांच्या दोन लेकी अमेरिकेत राहतात त्यांना भेटायला ते गेले असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी देखील त्याची पुष्टी केली आहे.
अभिनेते Dharmendra वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेत गेल्याची चर्चा असताना त्यांनी सोशल मीडीयामध्ये अमेरिकेत हॉलिडे चा आनंद लुटत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. धर्मेंद्र यांच्या ट्वीटर हॅन्डल वर त्यांचा एक व्हिडिओ कुत्र्यासोबत खेळतानाचा टाकला आहे. या व्हिडिओ च्या कॅप्शन मध्ये 'खूप दिवसांनी अमेरिकेत हॉलिडेचा आनंद घेत आहे. नव्या फिल्मसाठी लवकरच भारतामध्ये येणार असल्याचं' त्यांनी म्हटलं आहे. धर्मेंद्र यांच्या दोन लेकी अमेरिकेत राहतात त्यांना भेटायला ते गेले असल्याचं सांगितलं जात आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)