Cruise Ship Drug Case: आर्थर जेलमध्ये Aryan Khan आणि इतरांना 3-5 दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात येणार

काल त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

शाहरुख व आर्यन खान (संग्रहित संपादित प्रतिमा)

ड्रग प्रकरण आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. काल त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे व आज त्याच्या जमीन अर्जावर सुनावणी पार पडत आहे. अशात एनसीबी त्याला घेऊन आर्थर रोड (Arthur Jail) जेलमध्ये पोहोचली आहे. आता आर्यन खान आणि इतर आरोपींना आर्थर जेलमध्ये 3-5 दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात येईल, असे आर्थर जेलचे अधीक्षक नितीन वायचल म्हणाले आहेत.