Prabhas' Salaar Movie Release Date: डंकीला टक्कर देण्यासाठी सालार चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
सालार चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
Salar Release Date: प्रभासच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. सालार चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. निर्मात्यांनी सालारचे नवीन पोस्टर रिलीज केले ज्यामध्ये प्रभासचा नवा लुक पाहायला मिळाला आहे. हा चित्रपट यावर्षी 22 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित शाहरुख खान स्टारर डंकी 22 डिसेंबरला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या घोषणेमुळे या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये निश्चित टक्कर होणार हे निश्चित झाले आहे. सालरचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)