Godfather Hindi Trailer: चिरंजीवी खेळणार राजकारणाचा खेळ; होणार सलमान खानची एन्ट्री, पाहा 'गॉडफादर'चा हिंदी ट्रेलर

ट्रेलर लॉन्च दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या. दोन्ही दिग्गज स्टार्स मुंबईतील जुहू पीव्हीआरमध्ये स्पॉट झाले होते. चिरंजीवी (Chiranjeevi) आणि सलमान खानचे फोटो सोशल मीडियावर सगळीकडे आहेत.

Godfather Hindi Trailer (Photo Credit - Twitter)

साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'गॉडफादर'चा हिंदी ट्रेलर (Godfather Hindi Trailer) आज रिलीज झाला आहे. ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये चिरंजीवीला सपोर्ट करण्यासाठी सलमान खानही (Salman Khan) पोहोचला होता. ट्रेलर लॉन्च दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या. दोन्ही दिग्गज स्टार्स मुंबईतील जुहू पीव्हीआरमध्ये स्पॉट झाले होते. चिरंजीवी (Chiranjeevi) आणि सलमान खानचे फोटो सोशल मीडियावर सगळीकडे आहेत. 'गॉडफादर' हा चित्रपट 5 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात सलमान खानसोबत चिरंजीवीची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. 'गॉडफादर'मध्ये सलमानचा खास कॅमिओ आहे. 'ल्युसिफर' या तमिळ चित्रपटावर आधारित 'गॉडफादर'मध्ये सलमान खान छोटी भूमिका साकारणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now