Shah Rukh Khan Visits Vaishno Devi Temple: 'डंकी' रिलीज होण्यापूर्वी शाहरुख खान पोहचला वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी (Watch Video)

किंग खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याची टीम त्याच्यासोबत दिसत आहे आणि अभिनेता हुडीने चेहरा झाकून चालताना दिसत आहे.

शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'डिंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. आधी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आणि आता चित्रपटाच्या यशासाठी तो वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जम्मूला पोहोचला आहे. किंग खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याची टीम त्याच्यासोबत दिसत आहे आणि अभिनेता हुडीने चेहरा झाकून चालताना दिसत आहे. शाहरुख खान पठाण आणि जवान चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आला होता आणि हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. डंकीही ब्लॉकबस्टर ठरेल, अशी आशा चाहत्यांना पुन्हा एकदा वाटत असून जल्लोष व्यक्त होत आहे. (हेही वाचा  - Dunki Drop 5: शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाचा ड्रॉप 5 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, दिग्दर्शकाने दिली माहिती)

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement