Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: जान्हवी किल्लेकरने 9 लाखांची पैशांची बॅग उचलून घेतली खेळातून माघार
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व अवघ्या 70 दिवसांमध्ये संपणार असून पाचव्या पर्वाचा महाविजेत्याची घोषणा आज केली जाणार आहे.
Bigg Boss Marathi 5 Grand Finale: ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व अवघ्या 70 दिवसांमध्ये संपणार असून पाचव्या पर्वाचा महाविजेत्याची घोषणा आज केली जाणार आहे. पाचवं पर्व यंदा 28 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. सीझनमध्ये एकूण 16 स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात सहभाग घेतला होता. या 16 जणांपैकी अनेक अडचणींवर मात करून फक्त सहा जणांचा घरात शेवटपर्यंत निभाव लागला असून यापैकी कोणीतरी एक जण आज जिंकणार असून या कार्यक्रमात बिग बॉसने स्पर्धकांना एक ऑफर दिली होती, शोमधून पैसे घेऊन बाहेर जाण्याची ऑफर दिली. यंदा ही Money Bag उचलून जान्हवीने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तब्बल 9 लाख घेऊन जान्हवी बाहेर पडली आहे.
पाहा पोस्ट -
Bigg Boss Marathi Grand Finale Live – जान्हवी किल्लेकर घरातून बाहेर, पैशांची बॅग स्वीकारली; मिळाले इतके लाख
— Saamana (@SaamanaOnline) October 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2024 07:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

