Snehal Rai: 'इच्छाधारी नागिन'मध्ये दिसलेल्या स्नेहल रायचा मोठा खुलासा; 10 वर्षांपूर्वी केलं राजकारणी माधवेंद्र कुमार राय यांच्याशी लग्न

स्नेहल रायने 10 वर्षांपूर्वी लग्न केल्याचे सांगितले. आता ती लवकरच एका सौंदर्य स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Snehal Rai (PC - Instagram)

Snehal Rai: टेलिव्हिजन अभिनेत्री स्नेहल राय हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने आपल्यापेक्षा 21 वर्षांनी मोठ्या नेत्याशी लग्न केल्याची माहिती दिली आहे. यानंतर सोशल मीडियावर दोघांची नावं ट्रेंड होऊ लागली. त्याचबरोबर अनेकांनी त्यांचे अभिनंदनही केले आहे. स्नेहल रायने इश्क का रंग सफेद, जनमन का बंधन, इच्छाधारी नागिन, परफेक्ट पती आणि विष या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पती माधवेंद्र कुमार राय याच्यासोबत ती गेल्या 10 वर्षांपासून नात्यात असल्याची माहिती तिने दिली आहे. स्नेहल रायने 10 वर्षांपूर्वी लग्न केल्याचे सांगितले. आता ती लवकरच एका सौंदर्य स्पर्धेत सहभागी होणार आहे. (हेही वाचा - Raghav Chadha-Parineeti Chopra's Wedding: राघव चढ्ढा-परिणिती चोप्राचे लग्न उदयपूरमध्ये होणार; वेडिंग डेस्टिनेशन फायनल करत आहे जोडपे)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)