Bhool Bhulaiyaa 3 Teaser: कार्तिक आर्यन आणि विद्या बालन स्टारर 'भूल भुलैया 3' चा टीझर रिलीज, दिवाळीत थिएटरमध्ये दाखल होणार

अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत आहेत.

Bhool Bhulaiyaa 3 Teaser - Photo Credit - Youtube

कार्तिक आर्यन आणि विद्या बालन स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' चा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरने त्यांना पुन्हा एकदा मंजुलिका आणि रूह बाबा यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मंजुलिकाचा धडकी भरवणारा अवतार आणि रूह बाबाची कॉमिक टायमिंग टीझरमध्ये पाहायला मिळते.

भूल भुलैया 3 हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे कारण त्याचे मागील दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले होते. यावेळीही चित्रपट निर्मात्यांनी प्रेक्षकांची निराशा करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि मुराद खेतानी यांनी केली आहे. हा चित्रपट 2024 च्या दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पाहा टिझर  -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now