Dream Girl 2 Teaser: आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, जाणून घ्या कधी येणार 'ड्रीम गर्ल पूजा'
29 जून 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राज शांडिल्य या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.
आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) यशस्वी चित्रपट 'ड्रीम गर्ल' 2019 साली प्रदर्शित झाला. आता त्याचा सिक्वेल जाहीर झाला आहे. सध्या अनेक बॉलिवूड चित्रपट बहिष्काराच्या ट्रेंडला सामोरे जात आहेत. त्याची तुलना दाक्षिणात्य चित्रपटांशी केली जात आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा निर्मात्यांनी 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) ची घोषणा केली तेव्हा त्यांनी एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. आयुष्मान आणि अनन्या पांडे पहिल्यांदाच 'ड्रीम गर्ल 2' मध्ये एकत्र दिसणार आहेत. ईदच्या मुहुर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 29 जून 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राज शांडिल्य या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)