Athiya Shetty आणि KL Rahul यांच्या लग्नाची तयारी सुरु; खंडाळ्यात Suniel Shetty च्या घरी बांधणार लग्नगाठ- Reports

मुंबईतील 5 स्टार हॉटेल्स सोडून अथिया आणि केएल राहुलने खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या घरी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी (Photo Credits: Instagram)

सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि तिचा क्रिकेटर बॉयफ्रेंड केएल राहुल अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे अनेकदा हातात हात घालून दिसले आहेत. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार या दोघांच्या लग्नाची तयारी आतापासून सुरू झाली आहे. अनेक जवळच्या लोकांशी बोलल्यानंतर, पिंकविलाला कळले की अथिया शेट्टी आणि केएल राहुल खरोखरच लग्न करत आहेत. एक प्रसिद्ध वेडिंग प्लॅनर त्याच्या टीमसह खंडाळ्याला भेट देण्यासाठी आल्याचे पिंकव्हिलाच्या सूत्रांनी सांगितले. मुंबईतील 5 स्टार हॉटेल्स सोडून अथिया आणि केएल राहुलने खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या घरी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now