Arijit Singh Took Duplex As Payment: अरिजित सिंगने लग्नात परफॉर्म करण्यासाठी मानधन म्हणून घेतले मुंबईत डुप्लेक्स घर; Rapper Ikka चा खुलासा (Video)

रॅपर इक्का सिंगने सांगितले की, एआर रहमान एका लाइव्ह शोसाठी 3 कोटी रुपये घेतो, पण एकदा अरिजितने मुंबईत एका लग्नात दीड तासाच्या परफॉर्मन्ससाठी मानधन म्हणून डुप्लेक्स घर घेतले होते.

Arijit Singh (Photo Credits: Facebook)

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंगला वेगळ्या कुठल्या ओळखीची गरज नाही. आपल्या आवाजाने त्याने कोट्यावधी लोकांची मने जिंकली आहेत. देशासह जगभरात त्याची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. आजकाल तर त्याच्या गाण्यांशिवाय कोणताही प्रसंग, लग्न किंवा कार्यक्रम पूर्ण होत नाही. आपला सुरेल आवाज आणि साधेपणाने अरिजित सिंगने सर्वांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. अलीकडे रॅपर रफ्तारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने अरिजितच्या गायनाचे आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले आहे.

शान पराशरच्या पॉडकास्टमध्ये, रफ्तारने अरिजितशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या. रफ्तार म्हणाला, 'आमच्या इंडस्ट्रीत अरिजितसारखा प्रतिभावान क्वचितच कोणी असेल.' या संभाषणात रॅपर इक्का देखील उपस्थित होता. रॅपर इक्का सिंगने सांगितले की, एआर रहमान एका लाइव्ह शोसाठी 3 कोटी रुपये घेतो, पण एकदा अरिजितने मुंबईत एका लग्नात दीड तासाच्या परफॉर्मन्ससाठी मानधन म्हणून डुप्लेक्स घर घेतले होते. कल्पना करा मुंबईत अशा अपार्टमेंटची किंमत किती आहे. त्याने पुढे नमूद केले की, अरिजितने नेहमीच आपल्या तत्त्वांना प्राधान्य दिले. त्याला स्टेज शो आवडतात आणि फक्त तेच तो करतो. (हेही वाचा: Rakhi Sawant 46th Birthday Celebration: राखी सावंतने दुबई मध्ये साजरा केला 46 वा वाढदिवस; शिव ठाकरे सह अनेकांचा सेलिब्रेशन मध्ये सहभाग)

Arijit Singh Took Duplex As Payment:

 

View this post on Instagram

 

A post shared by Rapgame (@rapgame_dhh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now