Viral Video: विराट आणि अणुष्काच्या व्हायरल व्हिडिओची चर्चा, दुसऱ्यांदा होणार आई बाबा?

लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे दोघेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. सद्या अभिनेत्री अनुष्का वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Virat and Anushka Viral video

Viral Video: लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि  क्रिकेटर विराट कोहली हे दोघेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. सद्या अभिनेत्री अनुष्का वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर बेंगळूरु येथील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे नेटकऱ्यांनी कमेंट केले आहे. काही महिन्यापूर्वी देखील अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यांचा नेटकऱ्यांनी विचारणा केली होती. परंतु या संदर्भात अनुष्का आणि विराट या दोघांनी कोणतेही भाष्य केले नव्हते.  व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट हे बेंगळूरूच्या हॉटेल मध्ये फिरताना दिसत आहे. व्हिडिओत अनुष्काचा बेबी बंप दिसत आहे. विरुष्काच्या या व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कंमेट्स केले आहे. विरुष्का पुन्हा एकदा आई बाबा होणार असल्याने त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now