Amol Kolhe On RRR: ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंचे खास ट्विट, प्रादेशिक चित्रपटांचे केले कौतृक

हिंदी चित्रपटांच्या पलीकडे प्रादेशिक भारतीय चित्रपट कायमच लक्षवेधी असतात, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे

95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाच्या या यशासाठी सर्वच स्तरातून त्याचे कौतृक करण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देखील यासाठी एक खास ट्विट केले असून सध्या ते चर्चेचा विषय ठरत आहे. “हा क्षण देशासाठी अभिमानाचा आहे! मी स्वत: एका विशिष्ट भाषेतील सिनेसृष्टीत काम करत आहे. या निमित्ताने मला प्रादेशिक चित्रपटाचे (Reginal Movie) यश साजरा करण्याचे आणखी एक कारण मिळाले. कारण हिंदी चित्रपटांच्या पलीकडे प्रादेशिक भारतीय चित्रपट कायमच लक्षवेधी असतात. RRR च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन”, असे अमोल कोल्हेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटसोबत त्यांनी नाटू नाटू गाणे जे ऑस्कर सोहळ्यात सादर झाले त्याचा व्हिडीओही जोडला.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)