Amitabh Bachchan Coastal Road Tunnel Travel: अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा केला मुंबईच्या कोस्टल रोड टनेलमधून प्रवास; BMC ने मानले आभार (Watch Video)
या प्रवासात बिग बी खूपच आश्चर्यचकित दिसले. अमिताभ यांनी या प्रवासाचा एक व्हिडिओ आणि त्यांचा संपूर्ण अनुभवही त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
Amitabh Bachchan Coastal Road Tunnel Travel: बॉलीवूड मेगा स्टार अमिताभ बच्चन यांची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, जी सोशल मीडियावरही पाहायला मिळते. त्यामुळेच त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर दिसताच व्हायरल होतात आणि त्यांची चर्चा सुरू होते. नुकताच अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या कोस्टल रोड प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला होता, जो देखील क्षणार्धात व्हायरल झाला. आता बिग बी यांनी त्यांच्या कोस्टल रोडचा अनुभव शेअर केल्याबद्दल बीएमसीने त्यांचे आभार मानले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यातून प्रवास केला. या प्रवासात बिग बी खूपच आश्चर्यचकित दिसले. अमिताभ यांनी या प्रवासाचा एक व्हिडिओ आणि त्यांचा संपूर्ण अनुभवही त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. क्लिपमध्ये त्यांची कार बोगद्यातून जाताना दिसत आहे. बोगदा पाहून आश्चर्यचकित झालेल्या अमिताभ यांनी व्हिडिओला ‘चमत्कार’ असे कॅप्शन दिले आहे.
त्यावर बीएमसीची प्रतिक्रिया समोर आली आहे. बीएमसीने म्हटले आहे, ‘धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड बोगद्यातून तुम्ही प्रवासाचा आनंद लुटला याचा आम्हाला आनंद आहे. तुमचा अभिप्राय आम्हाला प्रत्येकाच्या सोयीसाठी मुंबईतील पायाभूत सुविधा आणखी वाढवण्यास प्रवृत्त करतो. आम्ही तुमच्यासारख्या आणखी सकारात्मक अनुभवांची वाट पाहत आहोत.’ (हेही वाचा: Vikrant Massey Tattoo: विक्रांत मेस्सीनं हातावर काढला मुलाच्या नावाचा खास टॅटू, पोस्ट व्हायरल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)