Amitabh Bachchan यांना मुंबई पोलिसांनी केली अटक? पोलिसांच्या गाडीजवळ उभे असतानाचा फोटो बिग बींनी केला शेअर
अमिताभ बच्चन यांनी मुंबई पोलिसांच्या वाहनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, अटक. ही पोस्ट पाहून युजर्सनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.
Amitabh Bachchan Arrested?: अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मेगास्टारला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे का? किंवा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यासाठी असा प्रकार केला आहे. अमिताभ बच्चन यांनी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वाहनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, अटक. ही पोस्ट पाहून युजर्सनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. पण शेवटी प्रकरण काय आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. नुकतेच अमिताभ यांनी हेल्मेट न घालता बाईक चालवतानाचा एक फोटो शेअर केला होता, ज्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ झाला होता. आता हे फोटो शेअर करण्यामागे अभिनेत्याचा हेतू काय असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे.
पहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)