Alka Yagnik Diagnosed With Rare Sensory Neural Nerve Hearing Loss: ज्येष्ठ गायिका अलका याज्ञनिक यांना दुर्मिळ अजारामुळे ऐकू येणं झालं बंद; पहा त्यांची भावनिक पोस्ट

Rare Sensory Neural Nerve Hearing Loss च्या निदानानंतर खूप जोरात आवाज आणि हेडफोन्स यांच्यापासून दूर राहण्याचे देखील आवाहन अलका याज्ञनिक यांनी केले आहे.

ज्येष्ठ गायिका अलका याज्ञनिक यांच्या आवाजामुळे 90 दीच्या शतकातील बॉलिवूडची अनेक गाणी गाजली. त्यानंतर अलका याज्ञनिक अनेकदा रिअ‍ॅलिटी शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसल्या मात्र सध्या त्या कलाक्षेत्रापासून दूर असल्याचं कारण त्यांनीच जाहीर केले आहे. वायरल अटॅक नंतर एक दिवस विमानातून उतरल्यानंतर अचानक त्यांना ऐकू येणं बंद झाल्याचं त्यांनी पोस्ट मध्ये लिहलं आहे. दरम्यान त्यांना Rare Sensory Neural Nerve Hearing Loss ने ग्रासलं असून औषधोपचार सुरू झाले असून या कठीण काळात प्रेम आणि प्रार्थना करा अशी त्यांनी चाहत्यांकडे अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी खूप जोरात आवाज आणि हेडफोन्स यांच्यापासून दूर राहण्याचे देखील आवाहन केले आहे.

Alka Yagnik यांची पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)