Mission Raniganj Trailer: 'मिशन रानीगंज - द ग्रेट भारत रेस्क्यू' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, अक्षय कुमार मुख्य भूमिकेत

हा चित्रपट टिनू सुरेश देसाई यांनी दिग्दर्शित केला असून 6ऑक्टोंबर 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'मिशन राणीगंज'चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये अक्षय कुमार जसवंत गिलच्या भूमिकेत दिसत आहे, जो कोळशाच्या खाणीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या मोहिमेवर निघतो. हा चित्रपट 1989 मध्ये झालेल्या कोळसा खाणी दुर्घटनेवर आधारित आहे. ट्रेलरमध्ये अक्षय कुमार खाणीत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी धडपडताना दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्राही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट टिनू सुरेश देसाई यांनी दिग्दर्शित केला असून 6ऑक्टोंबर 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  (हेही वाचा - Shivrayancha Chhava: 'सुभेदार' नंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर कडून ‘शिवरायांचा छावा’चित्रपटाची घोषणा; छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य सिनेमा)

पाहा ट्रेलर -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement