Akshay Kumarने अध्यात्मिक गुरू Sadhguru साठी OMG 2 चे विशेष स्क्रीनिंग

सद्गुरूंनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आणि ते फ्लाइंग डिस्कसोबत खेळताना दिसत आहेत

Sadguru And Akshay Kumar

अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ओह माय गॉड 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच खिलाडी कुमारने अध्यात्मिक गुरू सद्गुरु यांच्यासाठी OMG 2 चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित केले होते, आता सद्गुरूंनी त्याला प्रतिसाद दिला आहे. तरुणांसाठी हा चित्रपट आवश्यक असल्याचे त्यांनी दीर्घ टिपण्णीत म्हटले आहे. यासोबतच शिक्षण पद्धतीतही बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी लिहिले आहे. त्यानंतर अक्षय कुमारने सद्गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच, सद्गुरूंनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आणि ते फ्लाइंग डिस्कसोबत खेळताना दिसत आहेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now