यूके-इंडिया वीकमध्ये अभिनेत्री Sonam Kapoor करणार भारताचे प्रतिनिधित्व; ब्रिटनचे पंतप्रधान Rishi Sunak यांनी दिले निमंत्रण

सोनम 28 जून रोजी होणाऱ्या रिसेप्शनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित राहणार आहे.

Sonam Kapoor (Photo Credits-Twitter)

यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरला यूके-इंडिया वीक 2023 साजरा करण्यासाठी एका रिसेप्शनला आमंत्रित केले आहे. यूकेचे पंतप्रधान त्यांचे 10 डाऊनिंग स्ट्रीट येथील अधिकृत निवासस्थान आणि कार्यालयात या खास रिसेप्शनचे आयोजन करत आहेत. 26 जून ते 30 जून दरम्यान लंडनमध्ये आयोजित यूके-इंडिया वीक या इंडिया ग्लोबल फोरमच्या फ्लॅगशिप इव्हेंटचा हा रिसेप्शन एक भाग आहे. आठवडाभर चालणारा हा कार्यक्रम, राजकारण, व्यापार, व्यवसाय, शाश्वतता, समावेशन आणि नावीन्य यासह महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी व्यासपीठ प्रदान करून, दोन्ही देशांमधील भागीदारी मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. सोनम 28 जून रोजी होणाऱ्या रिसेप्शनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. (हेही वाचा: Bawaal Eiffel Tower Premier: वरुण धवन आणि जान्हवी कपूर रचणार इतिहास, आयफेल टॉवरवर होणार 'बावल'चा वर्ल्ड प्रीमियर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now