Abhishek Bachchan-Anupam Kher Emotional Video: सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनुपम खेर यांना धीर देताना दिसला अभिषेक बच्चन; भावनिक व्हिडीओ व्हायरल (Watch)

कौशिक यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे. त्यांच्या घरी चित्रपटसृष्टीतील अनेक लोक सांत्वनासाठी येत आहेत.

Abhishek Bachchan-Anupam Kher Emotional Video

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे बुधवारी, 8 मार्च रोजी राजधानी दिल्लीत निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. कौशिक दिल्लीत कारमधून प्रवास करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने चित्रपटसृष्टीसह, त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. कौशिक यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे. त्यांच्या घरी चित्रपटसृष्टीतील अनेक लोक सांत्वनासाठी येत आहेत. बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चनही सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी पोहोचला. जिथे तो अनुपम खेर यांना धीर देताना दिसला. अभिषेक बच्चन आणि अनुपम खेर यांच्या भेटीचा भावनिक व्हिडिओ सोशल मिडियावर व व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now