72 Hoorain Trailer: मुंबई दहशतवादी हल्ल्यावर बनलेल्या '72 हुरेन' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, हृदय पिळवटून टाकणारी कथा 7 जुलै रोजी होणार प्रदर्शित
हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
संजय पूरण सिंह चौहान दिग्दर्शित 72 हुरेन (72 Hoorain Trailer) या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा चित्रपट 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर आधारित आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये धर्माच्या नावाखाली माणूस कसा राक्षस बनतो हे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरच्या माध्यमातून प्रेक्षकांना उत्तेजित करण्याचा आणि भारतीय सुरक्षा दलांनी आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देऊन या दहशतवादी हल्ल्याचा कसा सामना केला याची आठवण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पुरण सिंह चौहान यांनी केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)