Salman Khan House Firing: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही शूटर्संना 10 दिवसांची पोलिस कोठडी

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबई न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी (PC - X/@roypranesh)

Salman Khan House Firing: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबई न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबई गुन्हे शाखेने मंगळवारी (16 एप्रिल) सांगितले की, दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुज जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी (14 एप्रिल) मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानच्या अपार्टमेंटबाहेर विकी आणि सुनीलने गोळीबार केला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement