Pandit P Khurana Passes Away: आयुष्मान खुरानाचे वडील पी खुराना यांचे निधन

मोहालीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. पी खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषी होते आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या जवळचे होते.

P Khurana

बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman Khurrana) आणि अपारशक्ती खुराना यांचे वडील पी खुराना (Pandit P Khurana) यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. ते एक प्रसिद्ध ज्योतिषी होते. रिपोर्ट्सनुसार, ते हृदयाच्या समस्येशी झुंज देत होते. मोहालीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता चंदीगड येथील मणिमाजरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पी खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषी होते आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या जवळचे होते. त्यांनी ज्योतिष विषयावर अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. हेही वाचा Amitabh Bachchan यांना मुंबई पोलिसांनी केली अटक? पोलिसांच्या गाडीजवळ उभे असतानाचा फोटो बिग बींनी केला शेअर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement