Kaun Banega Crorepati 16: अमिताभ बच्चन यांनी रतन टाटांसोबतच्या 'त्या' आठवणींना दिला उजाळा; टाटांच्या साधेपणाचा किस्सा एकूण उपस्थितांचे डोळे पाणावले (Watch Video)

किस्सा ऐकूण सर्वांचे अश्रू अनावर झाले.

Photo Credit- X

Kaun Banega Crorepati 16: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कौन बनेगा करोडपती 16 च्या एपिसोड दरम्यान दिवंगत भारतीय उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata)यांच्या साधेपणाची(Ratan Tata simplicity) आठवण करून देणारा एक भावनिक किस्सा शेअर केला. या एपिसोडमध्ये, बोमन इराणी आणि फराह खान(Farah Khan) पाहुणे म्हणून आले होते. अमिताभ यांनी रतन टाटा यांची नम्रता आणि साधेपणा दर्शविणारा एक मनमोहक किस्सा सांगितला. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की एकदा त्यांच्या एका मित्राने रतन टाटा यांना घर सोडण्यासाठी लिफ्ट मागितली. त्यावर टाटांनी एकदम साधेपणाने प्रतिसाद दिला. टाटा म्हणाले की, 'माझ्याकडे कार नाही.' त्यानंतर अमिताभ यांनी म्हटले की यावर केणाचा विश्वास बसणार नाही. 'तुमचा विश्वास बसेल का? हे अविश्वसनीय आहे.'

अमिताभ यांनी सांगितलेला किस्सा हा एका पार्टीतला होता. पार्टी संपल्यानंतर सगळ्या आपपल्या घरी चालले होते. त्यावेळी ही घटना घडली. त्यानंतर अमिताभ यांच्या मित्राने सर्व घटना त्यांना सांगितली. ही गोष्ट शेअर करताना बच्चन यांनी रतन टाटा यांच्या माणुसकी आणि साध्या व्यक्तिमत्त्वाला सलाम केला. 10 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटा यांच्या निधन झाले. संपूर्ण जगभरातील लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. (Ratan Tata Help BCCI: जेव्हा कठीण काळात बीसीसीआयला रतन टाटांनी दिली साथ, तेव्हा आयपीएलबाबत उचलले 'हे' मोठे पाऊल)

रतन टाटांच्या 'त्या' आठवणी

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)