‘Kesari 2’ OTT Release Date: अक्षय कुमार आणि आर. माधवन यांचा हिट चित्रपट 'केसरी: चॅप्टर 2' ओटीटीवर होणार रिलीज
थिएटरमध्ये धमाल केल्यानंतर 'केसरी: चॅप्टर 2' आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि आर. माधवन अभिनीत हा चित्रपट जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्याच्या परिणामांची कहाणी सांगतो.
‘Kesari 2’ OTT Release Date: केसरी चॅप्टर वनचा सिक्वेल 'केसरी 2' हा ('Kesari: Chapter 2') एक कोर्टरूम ड्रामा आहे. ज्यामध्ये वकील सी. शंकरन नायर यांच्या भूमीकेत अक्षय कुमार (Akshay Kumar ) दिसत आहे. 1919 च्या जालियनवाला हत्याकांडानंतर सी. शंकरन नायर यांनी कोर्टात ब्रिटिशांविरुद्ध खटला लढला आणि मारल्या गेलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याबाबत केसरी २ची कथा आहे.
'केसरी: चॅप्टर 2'13 जूनपासून जिओ हॉटस्टारवर
अक्षय कुमारने सी. शंकरन नायर यांच्या पात्राला रुपेरी पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न केला. चित्रपटगृहात प्रेक्षकांनी सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला. आता ही कथा म्हणजेच 'केसरी: चॅप्टर 2' 13 जूनपासून ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 13 जूनपासून घरी बसून हा चित्रपट चाहते अनुभवू शकतील. या चित्रपटात अनन्या पांडे देखील आहे.