Shreyas Talpade Health Update: हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदेची पत्नी दीप्तीने दिले अभिनेत्याच्या प्रकृतीसंदर्भात 'हे' अपडेट
दीप्तीने चाहत्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेबाबत कृतज्ञता व्यक्त केली. तसेच श्रेयसला काही दिवसांत डिस्चार्ड देण्यात येईल, असंही दिप्तीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितलं आहे.
Shreyas Talpade Health Update: अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याची तातडीने अँजिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली. पत्नी दीप्ती (Deepti) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. दीप्तीने चाहत्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेबाबत कृतज्ञता व्यक्त केली. तसेच श्रेयसला काही दिवसांत डिस्चार्ड देण्यात येईल, असंही दिप्तीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितलं आहे. श्रेयस अक्षय कुमार स्टारर 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे आणि यादरम्यान तो खूप उत्साहात सेटवर पोहोचला होता. त्याने त्याचा संपूर्ण भागही पूर्ण केला होता. मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार, या काळात त्याने काही अॅक्शन सीन्सही केले आणि त्यानंतर जेव्हा तो चित्रपटाचे शूटिंग संपवून घरी परतला. तेव्हा तो खूपच अस्वस्थ दिसत होता. अशा स्थितीत त्यांनी तत्काळ पत्नीला हा प्रकार सांगितला. त्यांची प्रकृती अधिकच बिकट झाल्याने त्यांची पत्नी त्यांना रुग्णालयात नेणार असतानाच त्यांला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो बेशुद्ध झाला. (वाचा - Shreyas Talpade Gets Heart Attack: लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; झाली अँजिओप्लास्टी- Reports)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)