Akshar Kothari Wedding: बचपन का प्यार! अभिनेता अक्षर कोठारी अडकला लग्नबंधनात, शेअर केले लग्नाचे खास क्षण!
अक्षरने लग्नाचे फोटो शेअर करत "Then, Now and Always" असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनसह त्याने 'बचपन का प्यार' हा हटके हॅशटॅगही दिला आहे. त्याचबरोबर दोघांनी त्यांच्या नावानुसार 'SaAkshar' हाही युनिक हॅशटॅग लिहिला आहे.
Akshar Kothari Wedding: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता अक्षर कोठारी (Akshar Kothari) आता लग्नबंधनात अडकला आहे. आपल्या खास शैलीसाठी ओळखला जाणारा अक्षरने नुकतेच विवाह केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले असून, त्याने सोशल मीडियावरून लग्नाचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अक्षरने सारिका खासनिस हिच्याशी लग्न केले असून, त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असेही सांगितले की ती त्याची बालपणीची मैत्रीण आहे. अक्षरने लग्नाचे फोटो शेअर करत "Then, Now and Always" असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनसह त्याने 'बचपन का प्यार' हा हटके हॅशटॅगही दिला आहे. त्याचबरोबर दोघांनी त्यांच्या नावानुसार 'SaAkshar' हाही युनिक हॅशटॅग लिहिला आहे. अक्षर कोठारी सध्या स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेतील त्याची अद्वैत ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)