Sexual Activity Data: धक्कादायक! Nissan, Kia सारख्या गाड्या प्राप्त करू शकतात चालकाच्या Sex Life ची माहिती- Reports

फायरफॉक्स वेब ब्राउझर मोझिला (Mozilla) च्या निर्मात्यानुसार, ग्राहकांनी त्यांचे फोन्स वाहनांना कनेक्ट केल्यानंतर बहुतेक ऑटोमेकर्स ड्रायव्हर्सबद्दल वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी विविध स्त्रोत तपासू शकतात.

Sexual Activity Data: धक्कादायक! Nissan, Kia सारख्या गाड्या प्राप्त करू शकतात चालकाच्या Sex Life ची माहिती- Reports
Nissan, Kia

आजकाल कार्समध्ये थक्क करणारे तंत्रज्ञान वापरले जात आहे. ग्राहकांना आरामदायी प्रवासासह इतरही सोयी-सुविधा पुरवण्यात कार उत्पादक कंपन्यांमध्ये चुरस पाहायला मिळते. आधुनिक कार्समधील टेक्नोलॉजी इतकी प्रगत आहे की, या गाड्या तुमच्या अगदी सेल फोनवरून रिमोट-स्टार्ट केल्या जाऊ शकतात. मात्र अशा कार्समध्ये जे तंत्रज्ञान वापरले जात आहे त्याद्वारे चालकाबाबतची बरीच गोपनीय माहिती कंपन्यांना मिळू शकते. याबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ऑटोमेकर्स निसान आणि किआ त्यांच्या ड्रायव्हर्सच्या ‘लैंगिक क्रियाकलाप’ आणि ‘सेक्स लाइफ’वरील डेटा गोळा करू शकतात आणि तो थर्ड पार्टीला विकू शकतात, असे एका नवीन अहवालात म्हटले आहे.

फायरफॉक्स वेब ब्राउझर मोझिला (Mozilla) च्या निर्मात्यानुसार, ग्राहकांनी त्यांचे फोन्स वाहनांना कनेक्ट केल्यानंतर बहुतेक ऑटोमेकर्स ड्रायव्हर्सबद्दल वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी विविध स्त्रोत तपासू शकतात. संशोधकांनी सांगितले की, कंपन्या तुमच्याबद्दलची अत्यंत गोपनीय माहितीही मिळवू शकतात. तुमची वैयक्तिक माहिती, वैद्यकीय माहिती, तुमची अनुवांशिक माहिती, तुमच्या लैंगिक जीवन, तुम्ही किती वेगाने गाडी चालवता, तुम्ही कुठे गाडी चालवता आणि तुम्ही तुमच्या कारमध्ये कोणती गाणी वाजता. अशा प्रकारचा डेटा कंपन्या गोळा करू शकतात. (हेही वाचा: World's First Flex-Fuel Car: नितीन गडकरींनी लॉन्च केली जगातील पहिली फ्लेक्स-इंधन कार Innova HyCross; इथेनॉल आणि इलेक्ट्रिक एनर्जीवर चालणार, जाणून घ्या सविस्तर)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2023 11:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).