Zoom क्लास दरम्यान माइक बंद करण्यास विसरला विद्यार्थी, फोनमधून X-Rated आवाज येऊ लागल्याने वर्गाला झाले मनोरंजन
तसेच शाळा अद्याप काही ठिकाणी सुरु न झाल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच शिकवले जात आहे. त्याचसोबत ऑफिसची मिटिंग असेल तरी सुद्धा झूम कॉल (Zoom Call), हँगआउटचा (Hangouts) वापर केला जात आहे.
कोरोना व्हायरसमुळे बहुतांश गोष्टी ऑनलाईन पद्धतीने केल्या जात आहेत. तसेच शाळा अद्याप काही ठिकाणी सुरु न झाल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच शिकवले जात आहे. त्याचसोबत ऑफिसची मिटिंग असेल तरी सुद्धा झूम कॉल (Zoom Call), हँगआउटचा (Hangouts) वापर केला जात आहे. पण झूम कॉलवर काही वेळेस एखादी लहानशी चूक सुद्धा सर्वांना थक्क करणारी ठरली आहे. अशातच आता एक प्रकार समोर आला असून त्यात झूम व्हि़डिओ कॉलिंगच्या वेळी ऑनलाईन वर्ग सुरु असताना विद्यार्थी ऑडिओ बंद करण्याचे विसरुन गेला. त्याच्या या चुकीमुळे एक्स रेटेड आवाजाने संपूर्ण वर्गाचे मनोरंजन झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे. त्याची क्लिप संपूर्ण वर्गाला मिळाली. एजिलाबेथ झूम क्लासचा हा व्हिडिओ सुरुवातीला टिकटॉकवर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ट्विटरवर व्हायरल होत आहे. या प्रकारावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.
लोकांनी हा प्रकार पाहिला असता काही जणांनी हास्यात्मक पद्धतीने त्याला उत्तर दिले आहे, तर काहींनी त्याला संमिश्र पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे.(Tesla Driver and Passenger Caught Sleeping in Moving Vehicle: टेस्ला कारमध्ये चालक आणि प्रवासी चालू गाडीत झोपले, दृश्य पाहून लोकांनी व्यक्त केला संताप; पहा व्हिडिओ)
Tweet:
Tweet:
Tweet:
जवळजवळ 40 सेंकदाच्या व्हिडिओत विद्यार्थ्याच्या आयकॉनवर एक लाइट दिसते, कारण त्याच्या डिवाइस मधून आवाज ऐकू येऊ शकतो. हा आवाज एक्स रेटेड असून खासकरुन सेक्स करताना येतो. काही विद्यार्थ्यांनी म्हटले की तो ठिक आहे ना? पण काही विद्यार्थ्यांनी मेसेजच्या माध्यमातून आपला माइक म्यूट करण्यास सुद्धा सांगितले. या व्हिडिओला टिकटॉकवर एकाच दिवशी 2 मिलियन पेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहे. त्यानंतर आता तो दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोहचला आहे.
दरम्यान, याआधी सुद्धा झूम कॉलच्या वेळी अशा प्रकारच्या घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जरी झूम कॉलच्या माध्यमातून क्लास किंवा मिटिंगमध्ये सहभागी होणार असाल तर सावधपणे तुमचा माइक म्यूट आणि अनम्यूट करा.