हैदराबाद मेट्रो स्टेशनच्या लिफ्ट्समध्ये तरूण कपल्सचे अश्लिल चाळे, सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियात व्हायरल
मात्र त्याचा वापर कॉलेजवयीन तरूणांकडून चूकीच्या कामासाठी केला जात असल्याचं चित्र समोर आलं आहे.
फूट ओव्हर ब्रीजेस, स्कायवॉक्स यानंतर आता मेट्रो स्टेशनच्या लिफ्ट्सदेखील प्रेमी युगुलांसाठी आता अश्लील चाळ्यांचा अड्डा बनत असल्याचं चित्र समोर आलं आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये लिफ्टमधील अश्लिल चाळ्यांचा व्हिडिओ झपाट्याने पसरत आहे. सीसीटीव्ही फूटेज असलेला व्हिडिओ बाहेर कसा पडला? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ हैदराबाद मेट्रो स्टेशनमधील (Hyderabad Metro Rail Limited)आहे.
हैदराबाद मेट्रो स्टेशन येथे दिव्यांग आणि वयोवृद्धांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहचता यावं याकरिता लिफ्टची सुविधा आहे. मात्र त्याचा वापर कॉलेजवयीन तरूणांकडून चूकीच्या कामासाठी केला जात असल्याचं चित्र समोर आलं आहे. लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये सारे अश्लिल चाळे रेकॉर्ड झाले आहेत.
हैदराबाद मेट्रो येथील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेच्या एमडींनी या प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी केवळ तरुणांची ओळख पटवणं हा उद्देश नसून सीसीटीव्हीचं हे फूटेज मोबाईलमध्ये व्हायरल कसं झालं? याचा छडादेखील लावला जाणार आहे. लवकरच मेट्रोसारख्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलक वाढवले जातील असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.