Top 10 Trending YouTube Videos of 2022: सरत्या वर्षातील सर्वाधिक ट्रेंडिंग YouTube व्हिडिओ, ज्यांनी नेटकऱ्यांना घातली भूरळ
युट्युबने सालाबादप्रमाणे यांदाही अव्वल ठरलेल्या काही प्रमुख व्हिडिओंची एक सूची प्रसाखीत केली आहे. YouTube वरील Culture & Trends टीमने या वर्षी विविध चॅनेलवरील शेकडो व्हिडिओंचे परीक्षण केले, जेणेकरून टॉप 2022 निर्माते आणि व्हिडिओंची यादी तयार केली जाईल. या परीक्षणानुसार यंदा जगभरात कॅरी मिनाटी, राउंड2हेल, बीबी की वाइन्स इतर काही व्हिडिओ अव्वल ठरले.
Year Ender 2022: कोणत्याही वर्षाचा नेव्हेंबर महिना संपून डिसेंबर महिना सुरु झाला की, वेद लागतात ते नव्या वर्षाचे. सहाजिकच मग नव्या वर्षात केल्या जाणाऱ्या संकल्पांसोबतच चर्चा सुरु होते सरत्या वर्षात घडलेल्या घटनांची. काही खास संस्थाही त्या त्या वर्षी त्यांच्या क्षेत्रात घडलेल्या घटनांची एक क्रमवार यादीच देते. युट्युबनेही अशी यादी दिली आहे. युट्युबने सालाबादप्रमाणे यांदाही अव्वल ठरलेल्या काही प्रमुख व्हिडिओंची एक सूची प्रसाखीत केली आहे. YouTube वरील Culture & Trends टीमने या वर्षी विविध चॅनेलवरील शेकडो व्हिडिओंचे परीक्षण केले, जेणेकरून टॉप 2022 निर्माते आणि व्हिडिओंची यादी तयार केली जाईल. या परीक्षणानुसार यंदा जगभरात कॅरी मिनाटी, राउंड2हेल, बीबी की वाइन्स इतर काही व्हिडिओ अव्वल ठरले.
Google च्या मालकीचा प्लॅटफॉर्म युट्युबने 5 डिसेंबर रोजी मागील वर्षातील (2022) अव्वल 10 ट्रेंडिंग व्हिडिओ, संगीत व्हिडिओ आणि लहान व्हिडिओंची यादी जारी केली. त्यासोबतच 2022 मधील भारतातील शीर्ष निर्माते, यशस्वी निर्माते आणि महिला नवोदित निर्मात्यांची यादी जारी केली. (हेही वाचा Year Ender 2022: जानेवारी ते डिसेंबर, विद्यमान वर्षातील नाट्यमय राजकीय घडामोडी, घ्या जाणून)
भारतातील टॉप 05 ट्रेंडिंग व्हिडिओंची यादी
- AGE OF WATER by Round2Hell
- Sasta Shaark Tank by Ashish Chanchlani
- INDIAN FOOD MAGIC by CARRYMINATI
- Arabic Kuthu -Beast First Single Promo bh Thalapathy Vijay, Sun Pictures, Nelson and Anirudh
- Daaru With Dad 3 by Harsh Beniwal
दरम्यान, Culture & Trends टीमने दिलेल्या माहितीनुसार काही नवीन निर्माते, युट्युबर देखील यादीत स्थान मिळविण्यास सक्ष असल्याचे आढळले. भारताबाबत बोलायचे तर तांत्रिकदृष्ट्या, गेमिंग चॅनेलवरील गेमिंग व्हिडिओ 2022 मध्ये भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)