जगातील सर्वात वृद्ध Masazo Nonaka या जपानी व्यक्तीचं वयाच्या 113 व्या वर्षी निधन

राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

Masazo Nonaka (Photo Credits: Twitter)

जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती (World's Oldest Man) मसाजो नोनाका (Masazo Nonaka) यांचं वयाच्या 113 व्या वर्षी निधन झालं आहे. मूळचे जपानी (Japan) असलेल्या मसाजो नोनाका यांचं रविवारी निधन झाल्याची माहिती जपानी मीडियाने दिली आहे. 1905 साली जन्म झालेल्या नोनाका यांचं नाव जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आलं होतं.राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

मसाजो नोनाका यांच्या बाबत काही खास गोष्टी

जपानमध्ये अनेक लोकांच्या नावावर सर्वात वृद्ध व्यक्तीचा विक्रम आहे. यापूर्वी 2013 साली जिरोमोन किमुरा या जपानी व्यक्तीने 116 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला तर 1997 साली 122 वर्षीय जपानी व्यक्ती जीन लुईस यांच्या नावावरही हा विक्रम होता.