बंगळूरू मधील बँकेच्या व्यवस्थापकाने कर्ज मंजुरीसाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे या महिलेने बँकेच्या व्यवस्थापकाला भररस्त्याच दांडुक्याने धुतले असल्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
कर्नाटकातील दावणगेरे येथील एका बँकेमध्ये एक महिला कर्ज मंजुरासाठी गेली होती. त्यावेळी तिला कर्ज मंजुरीसाठी बँकेच्या व्यवस्थापकाकडे पाठविण्यात आले. मात्र या वेळी व्यवस्थापकाने कर्ज मंजुर करण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली. यामुळे ही महिला संतप्त झाली आणि व्यवस्थापकाला रस्त्याच दांडुकाने त्याला धुतले आहे. या व्हिडिओतील महिलेने कोणतीही भीती न बाळगता चोप देणे सुरु ठेवले. तर महिला चोप देत असताना व्यवस्थापक रस्त्यावरील लोकांना हाका मारत होता. परंतु त्याच्या मदतीसाठी कोणी पुढे आले नाही.
#WATCH Woman in Karnataka's Davanagere thrashes a bank manager for allegedly asking sexual favours to approve her loan (15 October) pic.twitter.com/IiiKbiEgZ9
— ANI (@ANI) October 16, 2018
अखेर या व्यवस्थापकाने सर्वांसमोर या महिलेची माफी मागीतली आहे. तर समाजातील अशा विकृत व्यक्तींना अशीच अद्दल घडविल्या पाहिजे अशी मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे.