तोंडभरुन केक खाल्ल्याने महिलेचा गुदमरुन मृत्यू, ऑस्ट्रेलिया डे निमित्त मिठाई खाण्याच्या स्पर्धेत घडली घटना
हा केक तिच्या तोंडात आणि घशात अडकला. त्यामुळे तिला श्वसनास त्रास होऊ लागला. तोंडातील केक बाहेर काढत तिने श्वास घ्यायचा प्रयत्न केला. परंतू, चक्कर येऊन ती खाली जमीनवर कोसळली. दरम्यान, घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी तिला सीपीआर देऊन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यात यश येऊ शकले नाही.
मिठाई खाण्याच्या स्पर्धेत बाजी मारण्यासाठी तोंड भरुन केक खाणे एका महिलेच्या जीवावर बेतले आहे. या स्पर्धेत तोंड भरुन केक खाल्ल्याने या महिलेचा श्वास गुदमरुन मृत्यू झाला आहे. ही घटना ऑस्ट्रेलिया (Australia) देशातील क्वींसलैंड (Queensland) शहरात ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार ऑस्ट्रेलिया डे (Australia Day 2020) निमित्त हार्वी बे येथील बीच हाऊस हॉटेलमध्ये मिठाई खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 60 वर्षीय महिलेने सहभाग घेतला होता. तोंडात मोठ्या प्रमाणावर केक भरला गेल्याने महिलेचा श्वास कोंडला गेला. तिला श्वासच घेता येत नव्हता. आजूबाजूच्या लोकांनी तिला वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतू, त्यात यश आले नाही. परिणामी महिलेचा गुदमरुन जागीच मृत्यू झाला. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने समोर असलेला केक एकदम खाण्याचा प्रयत्न केला. हा केक तिच्या तोंडात आणि घशात अडकला. त्यामुळे तिला श्वसनास त्रास होऊ लागला. तोंडातील केक बाहेर काढत तिने श्वास घ्यायचा प्रयत्न केला. परंतू, चक्कर येऊन ती खाली जमीनवर कोसळली. दरम्यान, घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी तिला सीपीआर देऊन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यात यश येऊ शकले नाही. रुग्णवाहीका बोलावून या महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. (हेही वाचा, ग्राहकाच्या पिझ्झावर थुंकला डिलीवरी बॉय, होऊ शकते 18 वर्षे कारागृहाची शिक्षा, तुर्की येथील घटना)
दरम्यान, ही घटना ज्या हॉटेलमध्ये घडली त्या हॉटेलने आपल्या फेसबुक पेजवर या महिलेप्रती आपली संवेदना व्यक्त केली. ऑस्ट्रेलियामध्ये जास्तीत जास्त खाण्याच्या स्पर्धा नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. या वेळीही ऑस्ट्रेलिया डे निमित्त अनेक हॉटेल्समध्ये अधिक खाण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या दिवशी ऑस्ट्रेलियात आलेल्या पहिल्या युरोपीयन लोकांचे स्मरण केले जाते. त्यानिमत्त या स्पर्धा आयोजित करतात. या स्पर्धेत खास करुन केक, पेस्ट्री किंवा तशाच प्रकारचे पदार्थ अधिक खाण्याची स्पर्ध आयोजित केली जाते.