World's Richest Beggar: जगातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण आहे? मुंबईतील भिकारी Bharat Jain यांची संपत्ती जाणून उडेल तुमची झोप
आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यावर तो भीक मागू लागला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन किंवा आझाद मैदानाभोवती भारत जैन यांची भीक मागण्याची शैली लोकांना इतकी आवडली की त्यांना प्रचंड भिक्षा मिळू लागली.
World's Richest Beggar: भीक मागणे हा जगातील सर्वात निकृष्ट व्यवसाय मानला जातो. तुम्ही त्या भिकाऱ्याकडे तुच्छतेने बघत असाल, पण तुमच्या समोर उभा असलेला भिकारी करोडपती आहे, असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? मुंबईच्या रस्त्यावर भीक मागणाऱ्या जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्याची ओळख करून घेऊयात. या भिकाऱ्याचं नाव आहे भारत जैन. तुमच्या नजरेत भिकारी म्हणजे गरीब, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेली, विस्कटलेले घाणेरडे कपडे घातलेली आणि विस्कटलेले केस असणारी व्यक्ती असेल, तर तुम्हाला भारत जैन यांच्याबद्दल माहिती असेल, ज्यांची एकूण संपत्ती दिल्लीसारख्या शहराला कव्हर करण्यासाठी पुरेशी आहे. एवढ्या संपत्तीत तुम्ही भारतात आरामात राहू शकता. यात तुम्ही 5-6 पॉश फ्लॅट खरेदी करू शकता. दुस-या शब्दात, असेही म्हणता येईल की, भारत जैन यांच्यासाठी भीक मागणे ही केवळ मजबुरी नसून एक व्यवसाय आहे, जो त्यांनी एका वेगळ्या पातळीवर नेला आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे भारत जैन यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यावर तो भीक मागू लागला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन किंवा आझाद मैदानाभोवती भारत जैन यांची भीक मागण्याची शैली लोकांना इतकी आवडली की त्यांना प्रचंड भिक्षा मिळू लागली. भिकेच्या पैशातून बचत करण्याची सवय त्यांनी लावली आणि आज ते सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. (हेही वाचा -
जैन दर महिन्याला भीक मागून 60,000 ते 75,000 रुपये कमावतात, असे अहवालात म्हटले आहे. ते दररोज 10 ते 12 तास भीक मागत असून त्यांना सरासरी 2,000 ते 2,500 रुपये मिळतात. जैन यांचा मुंबईत 2BHK फ्लॅट आहे, ज्याची किंमत सुमारे 1.2 कोटी रुपये आहे. याशिवाय ठाण्यात जैन यांच्या नावावर दोन दुकाने असून, त्यातून त्यांना दरमहा 30 हजार रुपये भाडे मिळते. जैन हे कुटुंबाशिवाय इतर भिकाऱ्यांसारखे रस्त्यावर फिरणारे 'अनाथ' नाहीत.
जैन हे कायदेशीर विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ आणि वडील असा परिवार आहे. त्यांची मुले कॉन्व्हेंट शाळेत शिकली आहेत. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य आता स्टेशनरीचे दुकान चालवतात आणि जैन यांना भीक मागणे थांबवण्यास सांगतात. पण जैन यांचं म्हणणं आहे की, हा त्यांचा व्यवसाय असून यातचं त्यांचा आनंद आहे.