Death While Making Reels: रील्स बनवताना रेल्वेची धडक, दोघांचा मृत्यू, बिहारमधील खडगिया जिल्ह्यातील घटना (Watch Video)
ही तीन मुले रेल्वे ब्रीजवर जाऊन रिल्स बनवत होती. दाट धुक्यात ही मुले रिल्स बनवत असताना समोरुन येणारी ट्रेन त्यांच्या दृष्टीक्षेपास आली नाही. त्यामुळे ट्रेनची धडक बसून यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
बिहारमधील खडगिया येथे रेल्वे ब्रिजवर जाऊन रिल्स बनविणे तिन मुलांच्या जीवावर बेतले आहे. ही तीन मुले रेल्वे ब्रीजवर जाऊन रिल्स बनवत होती. दाट धुक्यात ही मुले रिल्स बनवत असताना समोरुन येणारी ट्रेन त्यांच्या दृष्टीक्षेपास आली नाही. त्यामुळे ट्रेनची धडक बसून यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तिसऱ्याने बाजूला उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले. परंतू, तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांगितले जात आहे की, अमन, सोनू आण नीतीश अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघे धामरा घाट स्टेशनजवळून कात्यायनी मंदिरात निघाले होते. दरम्यान, ही घटना घडली. जाताना त्यांनी मधला मार्ग निवडला याच वेळी सोनू रिल्स बनवत होता.