Viral Videos: प्रियकर प्रेयसीच्या प्रपोजमध्ये कुत्र्याचा अडथळा; मध्येच थांबववावा लागला कार्यक्रम

प्रतिदिन नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही इतके मजेशीर असतात की अनेकांच्या हस्याचे (Laughing) कारण ठरतात. त्यात हे व्हिडिओ जर प्राण्यांचे (Animals) असतील तर काही विचारुच नका. कारण प्राण्यांचे व्हिडिओ निर्भेळ आनंद देत असतात.

Dog Viral Videos | (Photo Credits-You Tube)

सोशल मीडिया (Social Media) म्हटलं की व्हायरल व्हिडिओ (Viral Videos) आलेच. प्रतिदिन नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही इतके मजेशीर असतात की अनेकांच्या हस्याचे (Laughing) कारण ठरतात. त्यात हे व्हिडिओ जर प्राण्यांचे (Animals) असतील तर काही विचारुच नका. कारण प्राण्यांचे व्हिडिओ निर्भेळ आनंद देत असतात. त्यात कोणतीही कृत्रिमता नसते. खास करुन कधी कधी प्राण्यांमुळे अशा काही गोष्टी घडतात. ज्यामुळे उपस्थितांना त्याची दखल घ्यावी लागते. आता इथे दिलेलाच व्हिडिओ पाहा ना. एक प्रियकर अगदी प्रेमाने आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज (Marriage Proposal) करतो आहे. त्याचे व्हिडिओ शुटींगही सुरु होते. इतक्यात एक कुत्रा तिथे आला आणि त्याने जे काही केले ते पाहून उपस्थितांना हसूच नाही आवडले.

आपण व्हिडिओत पाहू शकता एक प्रेमी युगूल विवाहबंधनात अडकण्यासाठी तयार होत आहे. प्रियकर आपल्या प्रेयसीला प्रपोज करतो आहे. तो आपली रिंग तिला देणार इतक्यात एक कुत्रा तिथे येतो. तो कुत्रा केवळ तिथे येऊन थांबत नाही. तर तो नैसर्गिक विधी करतो. लग्नासाठी प्रपोज करण्याच्या खास अशा क्षणाचे व्हिडिओ चित्रिकरण सुरु असतानाच ही घटना घडते. त्यामुळे या जोडप्याला एकमेकांना प्रपोज करताना काही वेळ थांबावे लागले. पण, इतके करुनही कुत्र्याने केलेली ती घटना कॅमेऱ्यात कैद झालीच.  Dog Vs Snake Viral Video: घराबाहेर फिरत असलेल्या कुत्र्याचा विशालकाय सापासोबत सामना, वाचा नेमके काय घडले (Viral Video)

व्हिडिओ

व्हायरल झालेला हा व्हिडिओ वायरलहॉग (ViralHog) या युट्युब चॅनलने शेअर केला आहे. ही माहिती लिहीपर्यंत 34,389 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता. व्हिडिओखाली शेकडो कमेंट्स येत आहेत. तसेच अनेकांनी हा व्हिडिओ लाईक आणि शेअर केला आहे. काही युजर्सनी म्हटले आहे की, 'कुत्र्याचे कर्म पाहून लोक टाळ्या का वाजवत आहेत? अशा घटना तर अनेक लोक करत असतात'. दुसऱ्या एका युजर्सने म्हटले आहे की, 'मला काहीच फरक पडत नाही. लोक काय विचार करतात'. मी आपले काम करत असतो. अर्थात हे कुत्र्याला उद्देशून होते.